पिंपरी (Pclive7.com):- पिंपरीतील संजय गांधीनगर परिसरात दुचाकीवरून आलेल्या टोळक्याने दहशत माजवत ७ ते ८ वाहनांची तोडफोड केली. ही घटना सोमवारी (दि.१३) रात्री साडेदहाच्या सुमारास घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरीतील संजय गांधीनगर परिसरात सोमवारी रात्री दुचाकीवरून टोळके आले. आरडाओरडा तसेच दहशत पसरवत त्यांनी परिसरातील गाड्यांची तोडफोड केली. घटनेनंतर टोळके पसार झाले. घटनेची माहिती मिळताच पिंपरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.






















Join Our Whatsapp Group