
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवडमधील भोसरी येथे पतीने पत्नीचा गळा दाबून खून करून त्यानंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. हा प्रकार आज मंगळवारी (दि.१४) भोसरी येथील शास्त्री चौक परिसरात उघडकीस आला. प्रियंका देशमुख (रा. शास्त्री चौक, भोसरी) असे खून झालेल्या पत्नीचे नाव असून निलेश देशमुख असे आत्महत्या केलेल्या पतीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पती निलेश आणि मयत पत्नी प्रियंका यांना सात वर्षाची मुलगी आहे. भोसरी मधील शास्त्री चौकात हे कुटुंब राहत होते. निलेश याने पत्नी प्रियंकाचा गळा दाबून खून केला. त्यानंतर स्वतः राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार आज मंगळवारी सकाळी उघडकीस आला आहे. पतीने हा खून का करून स्वत: आत्महत्या का केली? याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. भोसरी पोलीस पुढील तपास करत आहेत.






















Join Our Whatsapp Group