
पिंपरी (Pclive7.com):- भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने ‘नागरिकत्व संशोधन कायदा (CAA)’ या कायद्यासंदर्भात जनजागृती व्हावी व सर्व समाजातील भ्रम दूर व्हावेत याकरिता भारतीय जनता पार्टीचे जेष्ठनेते व माजी मंत्री विनोद तावडे यांच्या उपस्थितीत गुरुवार दि.१६ जानेवारी रोजी दुपारी २.३० वाजता पिंपरी कँम्प मधील बी.टी.अडवाणी धर्मशाळेत भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले अाहे. त्यानंतर विनोद तावडे हे पिंपरीमधील गुरूद्वारा, बौद्धविहार आदि मंदिरांनाही भेट देणार आहेत.
यावेळी मेळाव्यास विनोद तावडे यांच्यासोबत भाजपा शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, राज्यसभेचे खासदार अमर साबळे, आमदार महेश लांडगे, महापौर उषा उर्फ माई ढोरे, उपमहापौर तुषार हिंगे, नगरसेवक संदीप वाघेरे यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.






















Join Our Whatsapp Group