
पिंपरी (Pclive7.com):- श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठानच्या अंतर्गत श्री स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक संघ शिवतेजनगर यांचा ६ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भोसरी विधानसभाचे आमदार महेशदादा लांडगे, कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे हे होते.
या हास्यकल्होळ एक पात्री प्रयोग श्री मारुती यादव यांचा कार्यक्रम झाला. ज्या ज्येष्ठ नागरिकांच्या लग्नाला ५० वर्ष पूर्ण झालीत, त्या जोडप्यांचा आमदार लांडगे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ज्येष्ठ नागरिक हेच खरे आपल्या मुलाला संस्कार देत असतात. जुन्या परंपरा तसेच कुटुंब पद्धत जपावी असे आमदार लांडगे आपल्या भाषणात म्हणाले. या कार्यक्रमासाठी श्री स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष हरिनारायण शेळके, भाऊसाहेब कोकाटे, श्री स्वामी समर्थ महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ.अर्चनाताई तोंडकर, तसेच संतोष शेळके, मंगेश पाटील, अंजली देव, नीलिमा भंगाळे, प्रिया गायकवाड, मेघराज बागी, सूत्रसंचालन सुप्रसिद्ध निवेदिका सारिका रिकामे यांनी केले.






















Join Our Whatsapp Group