पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरातील विविध विकास कामांसाठी येणाऱ्या सुमारे ८७ कोटी २२ लाखांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मंजूरी देण्यात आली. स्थायी समिती सभागृहात आज झालेल्या या सभेच्या अध्यक्षस्थानी विलास मडीगेरी होते.

महापालिकेच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या रेफ्रिजरेशन व एयर कंडीशनिंग मेकॅनिक या व्यवसायाचे नुतनीकरण व अद्यावतीकरण करण्यासाठी येणाऱ्या ४ कोटी ७० लाख रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. प्रभाग क्र.१५ मधील गणेश तलावामधील गाळ काढणे व इतर अनुषंगिक कामे करणेकामी येणाऱ्या सुमारे ४२ लाख रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. प्रभाग क्र.१ चिखली येथील शेलारवस्ती व सोनवणेवस्ती परिसरात जलनि:सारण व्यवस्थेमध्ये सुधारणा करणेकामी येणाऱ्या सुमारे ५५ लाख रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. चऱ्होली मैलाशुद्धीकरण केंद्रांतर्गत प्रभाग क्र.२ येथे चिखली गावठाण, कुदळवाडी, बालघरेवस्ती, पवारवस्ती, पेठ प्रभाग क्र.१६, मोशी, बोऱ्हाडेवाडी, संजयगांधीनगर, बोऱ्हाटेवस्ती येथे आवश्यकतेनुसार जुन्या मलनि:सारण नलिका बदलणेकामी येणा-या सुमारे ५५ लाख रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. प्रभाग क्र.८ येथील तिरुपती चौक येथील तुलसी हाईट्स समोरील रस्ता ते पेठ क्र.१ ला नाशिक हायवे पर्यंत जोडणारा १२ मीटर डी पी रस्ता विकसित करणेकामी येणा-या सुमारे ६ कोटी ८२ लाख रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. प्रभाग क्र.३१ मधील रस्ते अत्याधुनिक पद्धतीने विकसित करणेकामी येणा-या सुमारे ३ कोटी ३७ लाख रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.
प्रभाग क्र.३१ मधील क्रांती चौक ते शनि मंदीर पर्यतच रस्ते अत्याधुनिक पद्धतीने विकसित करणेकामी येणा-या सुमारे ३ कोटी २९ लाख रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. प्रभाग क्र.२२ मधील ज्योतीबानगर येथील बाजीप्रभॅ चौक ते तापकीरमळा रस्त्याचे क्रॉकीटीकरण करणेकामी येणा-या सुमारे ५ कोटी ४१ लाख रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. प्राधिकरण, गंगानगर भागातील रस्त्याचे क्रॉकीटीकरण करणेकामी येणा-या सुमारे ५ कोटी ७५ लाख रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. प्रभाग क्र.१९ मधील अतर्गत रस्ते मजबुतीकरण/ सुधारणा/ नुतनीकरण/ स्टॅंप कॉक्रीटींग अद्यावत पद्धतीने करणेकामी येणा-या सुमारे ३ कोटी ११ लाख रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. प्रभाग क्र.१९ मधील दुर्गा कॉर्नर ते रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह हा रस्ता मजबुतीकरण/ सुधारणा/ नुतनीकरण/ स्टॅंप कॉक्रीटींग अद्यावत पद्धतीने करणेकामी येणा-या सुमारे ६ कोटी ५८ लाख रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. प्रभाग क्र. ३१ मधील ढोरे फार्म ते फेमस चौक रस्ता युटीव्हीटी पद्धतीने विकसित करणेकामी येणा-या सुमारे ३ कोटी ३७ लाख रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.
प्रभाग क्र. २० येथील संत तुकाराम नगर येथील उपरस्ते विशेष पद्धतीने विकसित करणेकामी येणा-या सुमारे ३ कोटी २९ लाख रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. प्राधिकरण ए.डी .सी परिसरातील रस्ते युटीव्हीटी पद्धतीने विकसित करणेकामी येणा-या सुमारे ५ कोटी २४ लाख रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. सं.नं.१ मधील आंतरराष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे उर्वरित अनुषंगिक विद्युत विषयक कामे करणेकामी येणा-या सुमारे ३ कोटी ७९ लाख रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. प्रभाग क्र.१ चिखली येथील राधास्वामी आश्रम येथील २४ मी.डी.पी. रस्ता विकसीत करणे कामी येणा-या सुमारे ९ कोटी ४१ लाख रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. प्रभाग क्र. ११ कृष्णनगर, शिवतेजनगर व हरगुडेवस्ती परिसरात जलनि:सारण व्यवस्थेमध्ये सुधारणा करणेकामी ६२ लाख रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. चिंचवड मैलाशुद्धीकरण केंद्राअंतर्गत प्रभाग क्र.१८ मधील चिंचवड गावठाण, रस्टन कॉलनी, लक्ष्मी नगर, यशोपुरम व इतर परिसरात जलनि:सारण विषयक सुधारण करणेकामी ५१ लाख रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. प्रभाग क्र.१० मध्ये महात्माफुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले समारकाचे सुशोभिकरण करणे व अनुषंगिक कामे करणेकामी येणाऱ्या १ कोटी ६३ लाख रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.
प्रभाग क्र.६ रामनगर, पांडवनगर इत्यादी ठिकाणी किरकोळ दुरूस्ती व देखभालीची कामे करणेकामी येणाऱ्या ३७ लाख रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. ह क्षेत्रीय कार्यालय व इतर मनपा इमारतींचे फर्निचर व इतर कामे करणेकामी येणाऱ्या २७ लाख रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. प्रभाग क्र.२९ मधील जलनि:सारण नलिकांची देखभाल दुरूस्ती करणेकामी येणाऱ्या २९ लाख रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. से.क्र.२३ मधील जलशुद्धीकरण केंद्राच्या वाढीव वीजभार मंजुरी साठी येणाऱ्या ३६ लाख रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. प्रभाग क्र.२२ येथील कोकणे नगर, क्रांतीवीर नगर, नढे नगर, राजवाडे नगर येथील जुन्या मलनि:सारण नलिकांची सुधारणा विषयक (UPGRADATION) कामे करणेकामी येणाऱ्या ७३ लाख रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. प्रभाग क्र.२२ येथील पवनानगर व विजय नगर येथील जुन्या मलनि:सारण नलिकांची सुधारणा विषयक (UPGRADATION) कामे करणेकामी येणाऱ्या ७२ लाख रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. प्रभाग क्र.२ मध्ये पुणे नाशिक महामार्गाचे पश्चिमेकडील नाला विकसित करणेकामी येणाऱ्या ५ कोटी २० लाख रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. प्रभाग क्र.२ मधील औद्योगिक वसाहत परिसरातील रस्ते डांबरीकरण करणेकामी येणाऱ्या ४.८३ लाख रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.
प्रभाग क्र.२४ थेरगाव येथील मंगलनगर, गणेशनगर, बेलठीकानगर, गुजरनगर व इतर परिसरातील जलनि:सारण विषयक व्यवस्थेमध्ये सुधारणा करणेकामी येणाऱ्या ४५ लाख रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. सांगवी मैलाशुद्धीकरण केंद्राअंतर्गत प्रभाग क्र.३१ त्रिमुर्ती कॉलनी व उर्वरित ठिकाणी जलनि:सारण व्यवस्थेमध्ये सुधारणा करणेकामी येणाऱ्या ४६ लाख रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. चिंचवड मैलाशुद्धीकरण केंद्राअंतर्गत प्रभाग क्र.१७ मधील चिंचवडे नगर, शिवनगरी, बलवंतनगरी व इतर परिसरातील जलनि:सारण विषयक सुधारणा कामे करणे व उर्वरित ठिकाणी जलनि:सारण नलिका टाकणेकामी येणाऱ्या ५२ लाख रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. प्रभाग क्र.३२ मधील परिसरात वार्षिक ठेकेदारी पद्धतीने सांगवी गावठाण, मुळानगर,मधुबन सोसायटी व उर्वरित भागामध्ये ड्रेनेज लाईनची व चेंबर्सची देखभाल दुरूस्ती करणेकामी येणाऱ्या ४६ लाख रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. सांगवी केंद्राअंतर्गत प्रभाग क्र.३१ कवडेनगर पासुन निळु फूले नाट्यगृहापर्यत जलनि:सारण व्यवस्थेमध्ये सुधारणा करणेकामी येणाऱ्या ४६ लाख रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. प्रभाग क्र.१७ येथील परिसरातील नदीच्या कडेने व नदीच्या कडेने असलेल्या जुन्या मुख्य गुरूत्व नलिका बदलून नव्याने आवश्यक व्यासाच्या मुख्य गुरूत्व नलिका टाकणेकामी येणाऱ्या ५५ लाख रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.
कासारवाडी मैलाशुद्धीकरण केंद्राअंतर्गत प्रभाग क्र.८ इंद्रायणीनगर मधील सेक्टर नं.४ व ६, सेक्टर नं.७ व १० लांडगेनगर, महाराष्ट्र कॉलनी येथे आवश्यकतेनुसार जुन्या मलनि:सारण नलिका बदलणेकामी येणाऱ्या ४५ लाख रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. प्रभाग क्र.३० मधील दापोडी गावठाण विठ्ठल मंदिर बॉम्बे कॉलनी परिसर व उर्वरित परिसरात आवश्यक त्या ठिकाणी जलनि:सारण व्यवस्थेमध्ये सुधारणा करणेकामी येणाऱ्या ४५ लाख रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. प्रभाग क्र.२६ पिंपळे निलख विशालनगर परीसरात उर्वरित ठिकाणी जलनि:सारण नलिका टाकणेकामी येणाऱ्या ४७ लाख रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. प्रभाग क्र.२६ मधील वाकड पिंक सिटी रस्ता ते मानकर चौकापर्यंत नाल्यामध्ये असलेली मलवाहीनी नाल्याबाहेर स्थलांतरीत करणेकामी येणाऱ्या ५० लाख रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. चिंचवड मैलाशुद्धीकरण केंद्राअंतर्गत प्रभाग क्र.१७ मधील वाल्हेकरवाडी, भालके कॉलनी व इतर परिसरात जलनि:सारण विषयक सुधारणा करणेकामी येणाऱ्या ५२ लाख रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. सांगवी मैलाशुद्धीकरण केंद्राअंतर्गत प्रभाग क्र.३१ राजीव गांधी वसाहत व उर्वरित ठिकाणी जलनि:सारण व्यवस्थेमध्ये विषयक सुधारणा करणेकामी येणाऱ्या ४६ लाख रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. ग क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत प्रभाग क्र.२१ व २७ मध्ये येणाऱ्या नाल्यातील अस्तित्वात असलेली ड्रेनेज लाईन रस्त्यावर स्थलांतरीत करणेकामी येणाऱ्या ६६ लाख रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.






















Join Our Whatsapp Group