मुंबई (Pclive7.com):- शिस्तप्रिय, कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळखले जाणारे तुकाराम मुंढे यांची नागपूर महापालिका आयुक्तपदी बदली झाली आहे. ते एडस नियंत्रण प्रकल्पाच्या संचालकपदावर होते. तत्कालीन फडणवीस सरकारने त्याची एडस नियंत्रण प्रकल्पाच्या संचालकपदावर नियुक्ती केली होती. आता त्यांची भाजपाची सत्ता असलेल्या नागपूर महापालिकेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे.