
पिंपरी (Pclive7.com):- हिंदुह्दयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ९३ व्या जयंती निमित्त पिंपरी चिंचवड शहरातील मातोश्री सामाजिक संस्थेचे अध्यक्ष गणेश आहेर यांच्या माध्यमातून पिंपरीतील शगून चौकात बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करत अभिवादन करण्यात आले.
यावेळी शिवसेनेचे माजी आमदार गौतम चाबुकसवार, जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, शहरप्रमुख योगेश बाबर, शिवसेना शहरसंघटिका उर्मिला काळभोर, चिंचवड विधानसभा संघटिका अनिता तुतारे, पिंपरी विधानसभा संघटिका सरिता साने, स्वरूपा खापेकर, वैशाली कुलथे, शिल्पा आनपण, वैभवी घोडे, शैला पाचपुते, अनूजा शिंदे, नयना होले, गूलाब गरूड, रोमी संधू, माधव मुळे, संतोष सौदणकर, सावल तोतानी, नितिन घोल, राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्ष रमेश नखाते, ग्राहक संरक्षण शहराध्यक्ष गणेश जाधव, वाहतूक आघाडी अध्यक्ष रूपेश यादव, शाम काळे, मिलींदराजे भोसले, दर्शन देसले व सर्व शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे मुख्य आयोजक मातोश्री सामाजिक संस्था कार्याध्यक्ष गोरख पाटील, उपाध्यक्ष प्रदिप दळवी, संघटक अंकुश कोळेकर, उपाध्यक्ष गणेश पाडुळे, माऊली जाधव, रविकिरण घटकार, विशाल बाविस्कर, मारुती म्हस्के, बाळासाहेब गायकवाड, दत्ता गिरी, अदिक भोसले, संजय गायके, अक्षय घटकार, संतोष हिवाळे, दिपक भक्त, नारायण खुशलानी, जितेंद्र चौधरी यांनी आयोजन केले होते.






















Join Our Whatsapp Group