
पिंपरी (Pclive7.com):- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त शिवशाही व्यापारी संघाच्या वतीने पिंपरीत बाळासाहेब ठाकरे अन्नछत्रालयाचे उद्घाटन भारतीय लहुजी शक्तीसेना संस्थापक अध्यक्ष शंकरभाऊ तडाखे यांच्या हस्ते करण्यात आले. याठिकाणी नागरिकांना केवळ १० रूपयांत शिवथाळी उपलब्ध होणार आहे. तसेच प्रत्येक जिल्हा व तालुक्यात शिवशाही व्यापारी संघाच्यावतीने अशी शिवभोजन थाळी सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा संस्थापक अध्यक्ष युवराज दाखले यांनी केली.
दरम्यान, शिवशाही व्यापारीसंघ प्रदेश सचिव आशिष वाळके यांच्या सुचनेने व शिवशाही व्यापारी संघ कोकण प्रदेशअध्यक्ष तुषारदादा कांबळे यांच्या अनुमोदनाने शिवशाही व्यापारी संघाच्या पदाधिकाऱ्यांची निवड आज करण्यात आली. पदाधिकारी पुढीलप्रमाणे अल्ताफ जावेद मन्सुरी (खोपोली शहरअध्यक्ष), नितीन लक्ष्मण चौगुले (रायगड जिल्हाअध्यक्ष), संतोष सकट (ठाणे जिल्हाअध्यक्ष), तुषार नारायण दाखले, (उल्हासनगर शहर अध्यक्ष), चंद्रशेखर जवानमल गोयल (खोपोली शिळफाटा उपाध्यक्षपदी) निवड केल्याची घोषणा युवराज दाखले यांंनी नवी मुंबई या ठिकाणी नियुक्ती पञक देऊन केली.
नवनियुक्त शिवशाही व्यापारी संघ पदाधिकारी यांना शुभेच्छा देऊन सर्वसामान्य जनकल्यानासाठी व व्यापारी बांधवांच्या सेवेसाठी कटिबद्द राहण्याच्या सुचना दाखले यांनी दिल्या. यावेळी शिवशाही व्यापारी संघ प्रदेश संघटक रविकिरण घटकार, कोकण प्रदेश अध्यक्ष तुषारदादा कांबळे, नवनाथ माऊली जाधव, अमोल तेलंगे, कृष्णादादा गायकवाड, दत्ता क्षिरसागर आदी पदाधिकारी उपस्थित होते.






















Join Our Whatsapp Group