पिंपरी (Pclive7.com):- वाकड येथे अज्ञातांनी एक्सीस बँकेचे एटीएम फोडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गॅस कटरच्या सहाय्याने मशीन कापून चोरट्यांनी तेथील ८ लाख रुपयांची रोकड लंपास केली आहे. ही रोकड चोरटे घेऊन गेले की मशीनला आग लागल्यानंतर रोकड जळून खाक झाली, हे मात्र नेमकं पोलिस आणि बँक अधिकाऱ्यांना सांगता येत नाही. परंतु मशीनमध्ये असलेले ८ लाख रुपये आता तेथे नसल्याचे अधिकार्यांचे म्हणणे आहे.

वाकड पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या दत्तमंदिर रोडवर सकाळी ही घटना उघडकीस आली आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत गेल्या तीन महिन्यांपासून सातत्याने एटीएम मशीन चोरी, एटीएम मशीन उचलून पळवणे असे प्रकार घडले आहेत. यामुळे पोलीस आयुक्तांनी विशेष तपास पथकाची स्थापना केली असून त्यांच्या हाती देखील अद्यापपर्यंत कोणतेच धागेदोरे लागलेले नाहीत. परंतू शहरात होत असलेल्या एटीएम चोरीच्या घटना रोखण्यात पोलीसांना अपयश येत आहे असेच म्हणावे लागेल.






















Join Our Whatsapp Group