
पिंपरी (Pclive7.com):- विश्व हिंदू परिषद, बजरंग दलवतीने श्रीराम जन्मभूमी आंदोलनातील हुतात्मा कोठारी बंधू व कारसेवेत बलिदान दिलेल्या असंख्य श्रीरामभक्तांच्या बलिदान समरणार्थ श्रद्धांजली वाहण्यासाठी दरवर्षी देशभरात महारक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते. यावर्षी रविवार दि.२ फेब्रुवारी रोजी पिंपरी चिंचवड शहरातही महारक्तदान शिबिराचे आयोजन पिंपरी, चिंचवड, आकुर्डी, काळेवाडी, पिंपळे सौदागर, राहटणी, संत तुकाराम नगर, दापोडी, दिघी, बोपखेल, भोसरी, गणेशनगर थेरगांव, भोरडेनगर थेरगाव, वाकड, मोशी, घरकुल चिखली, कासारवाडी अशा तब्बल १७ ठिकाणी करण्यात आले आहे.

शहरातील सर्व नागरिक व माता भगिनींना नम्र आव्हान करण्यात आले आहे की या महारक्तदान शिबिरात रक्तदान करून राष्ट्रकार्याच्या यज्ञकुंडात सहभागी व्हावे, आवाहन विहिंप, पिंपरी चिंचवड जिल्हा अध्यक्ष शरदराव इनामदार यांनी केले. अशी अधिकृत माहिती विहिंप, पश्चिम महाराष्ट्र प्रांत सह प्रचार प्रसार प्रमुख मुकुंद चव्हाण यांनी दिली.






















Join Our Whatsapp Group