पुणे (Pclive7.com):- पश्चिम महाराष्ट्र प्रांत गोरक्षा विभागाची प्रांत बैठक नुकतीच पार पडली, सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून भारतमाता प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून या बैठकीला सुरुवात झाली. या बैठकीला विहिंप, मुंबई क्षेत्र गोरक्षा प्रमुख भाऊरावजी कुदळे, पश्चिम महाराष्ट्र प्रांत मंत्री विजयराव देशपांडे, सहमंत्री विवेकजी कुलकर्णी, विहिंप कोषाध्यक्ष महेंद्रजी देवी, प्रांत सेवा प्रमुख दादा ढवाण व धर्मचार्य सहसंपर्क प्रमुख संजयराव कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती व मार्गदर्शन मोलाचे ठरले.
आज देशभरात NRC, CAA व CAB या विषयी एकीकडे समर्थन होत असताना दुसरीकडे विरोध होत आहे. या संदर्भात जनजागृती होणे गरजेचे असल्याचे मत उपस्थितांना मार्गदर्शन करताना प्रांत मंत्री विजयराज देशपांडे यांनी मांडले. गेले ५६ वर्षात परिषदेच्या सेवाभावी कार्यकर्त्यांनी समाजाच्या मूलभूत गरजांच्या पूर्तीसाठी हजारो सेवाप्रकल्पातुन दुर्गम दऱ्याखोऱ्या, जंगले, वने, पहाडी ग्रामीण भागातील लाखो अभावग्रस्त बांधवाना जीवनात आशेचा किरण प्रज्वलित करून स्वाभिमानी व स्वावलंबी समाज निर्माण केला आहे. पश्चिम महाराष्ट्रात शंभर पेक्षा अधिक सेवाप्रकल्प उपेक्षित अभावग्रस्त भागात चालविली जात आहेत. यापैकी बालिका आश्रम व विद्यार्थी वसतिगृह या प्रकल्पात शिक्षण संस्काराचे धडे घेणाऱ्या बालकांचे संमेलन “सेवाकुंभ” नांवाने नगर येथे दि. ८ व ९ फेब्रुवारीला संपन्न होत आहे. सेवा कुंभात सहभागी होण्याचे आव्हान प्रांत सेवा प्रमुख दादा ढवाण यांनी केली.
कासायाकडून कत्तलीसाठी जाणाऱ्या गोवंशाना वाचवीने त्यांना सुरक्षित स्थळी गोशाळेत ठेवण्यात मोठ्या प्रमाणात यश येत असून वृद्ध, भाकड गोवंशाच्या शेणापासून लाकूड बनविणे, बायोगॅस व गोमूत्रपासून अनेक उत्पादने बनवून ते उत्पादन बाजारात कसे आणता येईल तसेच गोमूत्रपासून बनवलेल्या आयुर्वेदिक औषधांचा मानवी शरीराला होणार उपयोग, गोरक्षणातून गोसेवा, गोसेवेतून सेंद्रिय शेती शेतकऱ्यांसाठी अनमोल वरदान ठरत असल्याचे व गोरक्षण, गोसंवर्धन, देशी गाय व गायीच्या दुध, तुपाचे महत्व या संदर्भात सर्वत्र जनजागृती होणे गरजेचे असल्याचे गोरक्ष व उपस्थितांना माहिती देताना भाऊरावजी यांनी आपले मत व्यक्त केले.
गोरक्षा विभागाच्या या बैठकीत गव्यपंच चिकित्सक, गोविज्ञान परिक्षक, शेणापासून लाकूड, बायोगॅस तयार करणारे उत्पादक, गोरक्षा प्रमुख, गोशाळा प्रमुख, गोरक्षा व गोसंवर्धन करणारे विविध संस्थेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्र संचलन प्रांत सहमंत्री विवेकजी कुलकर्णी यांनी केले व प्रांत गोरक्षा प्रमुख अनिल जोरी यांनी या बैठकीचे आयोजन केले होते ही बैठक इस्कॉन मंदिर, कमल नयन बजाज हॉल, कात्रज कोंढवा रोड येथे पार पडली अशी माहिती पश्चिम महाराष्ट्र सह प्रचार, प्रसार प्रमुख मुकुंद चव्हाण यांनी दिली.






















Join Our Whatsapp Group