पिंपरी (Pclive7.com):- पिंपरीतील आनंदनगर येथील रिपाईचे वार्ड अध्यक्ष राहुल मस्के व अल्पसंख्यांकचे राष्ट्रीय सचिव हाफिज फारूख शेख यांचे आकस्मित निधन झाल्याने त्यांच्या कुटंबियास रिपाई राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदासजी आठवले यांनी भेट दिली. दरम्यान राहुल मस्के यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. तसेच मंगल राहुल मस्के यांना पक्षाच्या वतीने पन्नास हजार रूपयांचा धनादेश देण्याच्या आला.
यावेळी प्रमुख रिपाईचे शहराध्यक्ष सुरेश निकाळजे, महाराष्ट्र राज्य सचिव बाळासाहेब भागवत, वाहतुक आघाडी प्रदेशाध्यक्ष अजिजभाई शेख, अल्पसंख्याक प्रदेश उपाध्यक्ष खाजाभाई शेख, बाळासाहेब रोकडे, दशरथ ठाणांबीर, युवा नेते कुणाल वाव्हळकर, राकेश वाघमारे, संजय सरोदे, मनोज जगताप, दिनकर मस्के, हरी नायर, यशवंत सुर्यवंशी, विलास कांबळे, माजी नगरसेवक लक्ष्मण गायकवाड, सुजित गायकवाड, अल्पसंख्याक शहराध्यक्ष नदाफभाई आदी उपस्थित होते.






















Join Our Whatsapp Group