पिंपरी (Pclive7.com):- महापोर्टल हे सरळ सेवा परीक्षाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांची फसवणूक व दिशभूल करत होते. महापोर्टलमुळे या सरकारबाबत आणि सरकारच्या धोरणाबाबत कमी अविश्वास निर्माण झाला होता. त्यामुळे हे पोर्टल बंद होण्याचा निर्णय स्वागतार्ह असल्याची प्रतिकिया पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी विद्यार्थी शहर शाखा क्र.२७ चे अध्यक्ष हर्षद परमार यांनी दिली.
हर्षद परमार म्हणाले की, हे महापोर्टल बंद करण्यासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेच्या वतीने वारंवार आंदोलन करण्यात आले होते. त्याचा पाठपुरावा केला गेला होता. त्याचे आता फळ मिळाल्याचा विद्यार्थ्यांना आनंद आहे. येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी विद्यार्थी संघटना सतत विद्यार्थ्यांच्या पाठीशी राहून काम करेल. व त्यांच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करणार असल्याची ग्वाही हर्षद परमार यांनी दिली.



















Join Our Whatsapp Group