पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या भोसरी येथील रूग्णालयात उपचार घेत असलेला कोरोनाच्या रुग्णाने हॉस्पिटलमधून पलायन केले असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना शनिवारी रात्री घडली असून यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या रुग्णाला परत आणण्यासाठी हॉस्पिटलचे कर्मचारी आणि पोलीस त्याच्या घरी पोहोचले आणि त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.
मात्र या घटनेमुळे रूग्णालयात सुरक्षा वाढविण्याची गरज वाढली असल्याची बाब समोर आली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये सध्या कोरोनाचे ९ रूग्ण असून त्यांच्यावर वायसीएम तसेच भोसरीतील महापालिकेच्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, नागरिकांनी भयभित होऊ नये, संसर्ग रोखण्यासाठी गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये, गरज असल्यासच घराबाहेर पडावे असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.



















Join Our Whatsapp Group