पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरात आणखी एका कोरोनाचा पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे. अमेरिकेतून तो दुबईमार्गे मुंबईत आला असून मुंबईतून तो पुण्यात आल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी पत्रकार परिषदेत आज मंगळवारी (दि.१७) दिली. त्यामुळे पिंपरी चिंचवडमध्ये कोरोना बाधित रूग्णांची संख्या १० वर पोहचली आहे.
परदेशातून प्रवास करणारे १०४८ प्रवासी काल रात्री पुणे विमानतळावर उतरले. त्यातील एकालाही कोरोनाचे लक्षण आढळली नाहीत. त्यामुळे त्या सर्वांना होम क्वारंटाईनच्या सूचना देऊन घरी सोडण्यात आले. अशातच मुंबईतून पिंपरी चिंचवडमध्ये आलेल्या एकाला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आज निष्पन्न झाले. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हा व्यक्ती अमेरिकेतून दुबईमार्गे मुंबईत आलेला होता. त्यानंतर मुंबईतून तो पुण्यात आला. त्यामुळे कोरोना बाधीत रुग्णांमध्ये आज आणखी एका रुग्णाची भर पडली आहे. पुणे जिल्ह्यात एकूण कोरोना बाधितांची संख्या आता १७ झाली आहे.