पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हूणन सरकारने जमावबंदी केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड शहरातील बहुतेक उद्योग ठप्प झाले आहेत. फुगेवाडी-दापोडीत परिसरात मोलमजुरी करून काम करणाऱ्या नागरिकांची संख्या जास्त आहे. कोरोनाच्या संसर्गमुळे ते नागरिक घरी बसून आहेत. त्यामुळे या नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. त्याच कारणामुळे येथील नागरिकांचे विद्युत बिल भरायचे राहिले आहे. तर काहींचे बील भरायचे बाकी असेल. अशा नागरिकाचा वीजपुरवठा ह्या महिन्यात खंडित करू नये अशी मागणी विद्युत अधिकारी श्री. सोनवणे यांना पिंपरी युवासेनेच्या वतीने निवेदन देऊन करण्यात आली.
यावेळी पिंपरी युवासेनेचे विभागसंघटक निलेश हाके, आशिर्वाद महिला संघाच्या सौ.शीलामामी जाधव, सामाजिक कार्यकर्ते नंदूभाऊ काची, अंकुश जाधव, शुभांगी गायकवाड आदी उपस्थित होते.





















Join Our Whatsapp Group