
पिंपरी (Pclive7.com):- कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुकारलेल्या ‘जनता कर्फ्यु’ला पिंपरी चिंचवडकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मात्र पहाटेपासून शहरात सर्वत्र पोलिस बांधव आपले कर्तव्य बजावत होते. नागरिकांच्या सुरक्षितेसाठी पोलीसांनी रस्त्यावर चोखपणे त्यांची ड्युटी बजावली. म्हणूनच शहरातील पोलीसांना पोलीस फ्रेन्डस् वेलफेअरच्या वतीने चहा तसेच बिसलेरी पाण्याच्या बाटलींचे वाटप करण्यात आले.
यावेळी संस्थापक अध्यक्ष गजानन चिंचवडे, पुणे जिल्हा अध्यक्ष निखिल येवले, मुळशी तालुका अध्यक्ष बाळासाहेब कलाटे, निखिल जाधव, कुंदन कच्छवा आदि उपस्थित होते.























Join Our Whatsapp Group