पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरात संचारबंदी काळातही काही ठिकाणी दारूची छुपी वाहतूक होत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. यामुळे मंगळवारी सात ठिकाणी छापे घालत २५ लाख ४८ हजार २५१ रुपयांची दारू जप्त करण्यात आली. याप्रकरणी १७ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
सहाय्यक पोलीस आयुक्त राजाराम पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, दरोडा विरोधी पथकाने निघोजे चाकण येथील दोस्ती बारवर छापा घालता. यावेळी विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्या वाहनासह ९ लाख ११ हजार १४५ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. तसेच कुरळीगाव येथे छापा मारून १० हजार १०० रुपयांचा दारू बनविण्यासाठी लागणारा मुद्देमाल हस्तगत केला. गुन्हे शाखा युनिट तीनच्या पथकाने भम व भीमा नंदीच्या संगमाजवळ गावठी दारूची हातभट्टी उद्धवस्त केली. यावेळी ८ लाख १७ हजार ५०० रुपयांचा ऐवज जप्त व नष्ट करण्यात आला. युनिट चारच्या पथकाने ताथवडे येथून हातभट्टीची दारू व इतर साहित्य असा २७ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला.
अमली पदार्थ विरोधी पथकाने भोसरी आळंदी रोडवरील संभाजीनगर येथील पान स्टॉलवर छापा मारून २२ हजार २० रुपयांची दारू जप्त केली.
गुन्हे शाखा युनिट एकाच्या पथकाने इंद्रायणी नदीच्या काठावरील दारू भट्टीवर छापा घालून ५१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत नष्ट केला. तसेच विविध पोलीस ठाण्यांकडून केलेल्या कारवाईमध्ये एकूण ७ लाख ८ हजार ९८६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करून नष्ट करण्यात आल्याची माहिती गुन्हे शाखेचे सहाय्यक आयुक्त राजाराम पाटील यांनी दिली.






















Join Our Whatsapp Group