पिंपरी (Pclive7.com):- कोरोनाच्या पार्श्ववभूमीवर राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. सर्वच व्यवसाय बंद आहेत. लॉन्ड्री व्यावसायिकांचे पोट हे रोज होणाऱ्या व्यवसायावर अवलंबून आहे. हातावर पोट असणारा लॉन्ड्री व्यवसाय आहे. हा व्यवसाय करताना काही व्यक्तिंची दुकाने भाडे तत्त्वावर आहेत. तर काही जण काही दुकानांच्या मालकाकडे रोजंदारीवर शेकड्यावर नग असा व्यवसाय करीत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर दैनंदिन खर्चाची मोठी कुऱ्हाड कोसळली आहे. त्यामुळे शासन दरबारी या समस्येवर तातडीने योग्य तो निर्णय घेऊन या समाजाला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी पिंपरी चिंचवड शहर लॉन्ड्री संघटनेचे कार्याध्यक्ष तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेलचे प्रदेशसचिव विशाल जाधव यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
यासंदर्भात विशाल जाधव यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आमच्या लॉन्ड्री व्यावसायिकांचे पोट हे रोज होणाऱ्या व्यवसायावर अवलंबून आहे. हातावर पोट असणारा लॉन्ड्री व्यवसाय आहे. हा व्यवसाय करताना काही व्यक्तिंची दुकाने भाडेतत्त्वावर आहेत. तर काही जण काही दुकानांच्या मालकाकडे रोजंदारीवर व्यवसाय करत आहेत. कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता शासनाने संचारबंदी केली आहे. यात काही व्यवसायिक व्यक्तिंना शेतजमीन अथवा इतर दुसरे व्यवसाय नाहीत. त्यामुळे लाँन्ड्री व्यवसाय बंद झाल्याने समाज बांधव हा उघड्यावर आला आहे. हे शासनाच्या निदर्शनास आणुन देण्याचा आमचा प्रयत्न आहे. शासनाच्यावतीने विविध योजनांच्या माध्यमातुन सुट दिली जात आहे. केंद्र शासनही विविध योजनाद्वारे जादाचे मानधन देण्याचा प्रयत्न करीत आहे. आमच्याही समाजाचे हातावर पोट आहे. मागिल आठवड्यापासून सर्वच्या सर्व दुकाने बंद झालेली आहेत. त्यामुळे त्यांच्यावर दैनंदिन खर्चाची मोठी कुऱ्हाड पडली आहे. त्यामुळे शासन दरबारी आपण स्वतः बाजु मांडावी असे समाज बांधवांना वाटत आहे. जेणेकरुन शासनस्तरावर याबाबत तातडीने निर्णय होवुन समाजाला मदत मिळण्याचा प्रयत करावा अशी मागणी जाधव यांनी केली आहे.






















Join Our Whatsapp Group