पिंपरी (Pclive7.com):- दिल्लीच्या निजामुद्दीन भागात काही दिवसांपूर्वी झालेल्या एका मोठ्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्यांमध्ये करोनाची लक्षणे दिसू लागली आहेत. त्यामध्ये पिंपरी चिंचवड शहरातील तब्बल ३२ नागरिक सहभागी झाले होते. त्यापैकी १४ जणांचा महापालिकेने शोध घेतला असून त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांच्या घशातील द्रावाचे नमुने उद्या ‘एनआयव्हीकडे’ तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत. दरम्यान, हे नागरिक शहरात येवून १५ दिवस उलटून गेले. त्यामुळे किती जणांच्या हे संपर्कात आले असतील हे सांगणे कठीण आहे. आणखी १८ नागरिकांचा शोध घेण्याचे काम सुरू असल्याचे महापालिका प्रशासनाने सांगितले.
दिल्ली मधील निजामुद्दीन परिसरात तबलीग ए जमात या संघटनेच्या वतीने तबलीगी जमानत हा कार्यक्रम घेण्यात आला. हा कार्यक्रम १३ ते १५ मार्च या कालावधीत पार पडला. कार्यक्रमासाठी भारताच्या विविध भागातून तसेच विदेशातून देखील मुस्लिम बांधव सहभागी झाले होते. हजारो लोक हे निजामुद्दीनमधील दर्ग्यामधील तबलीगी जमातच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते आणि त्यातील काही जण हे आधीच करोनाबाधित होते. त्यातील काही लोकांना करोनाचा संसर्ग झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामध्ये पिंपरी।चिंचवड शहरातील ३२ लोक या कार्यक्रमात सहभागी झाले होते. या कार्यक्रमात सहभागी झालेल्यांमध्ये करोना व्हायरसची लक्षणे दिसू लागल्याने खळबळ उडाली आहे.
हे नागरिक पिंपरीचिंचवड शहरात येवून १५ दिवस झाले आहेत. महापालिका प्रशासनाने त्या नागरिकांची माहिती काढण्यास सुरुवात केली आहे. आजपर्यंत ३२ नागरिक सहभागी झाले होते, अशी माहिती मिळाली. त्यापैकी १४ जणांचा महापालिकेने शोध घेतला असून त्यांना महापालिका रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
तसेच या नागरिकांच्या संपर्कात कोणी आले असेल अथवा कुणाला यांच्याबद्दल माहिती असेल तर महापालिका प्रशासनाला माहिती देण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.






















Join Our Whatsapp Group