पिंपरी (Pclive7.com):- राज्यासह संपूर्ण देशावर कोरोनाचं मोठं संकट आलं आहे. कोरोनाला हद्दपार करण्यासाठी सरकारने लॉकडाऊनची अंमलबजावणी केलीयं. त्यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आलीयं. म्हणूनच सामाजिक बांधिलीचे भान राखत पिंपरी युवासेना आणि आशिर्वाद महिला बचत गट यांनी गरजूंना मदतीचा हात दिलायं.
फुगेवाडी येथील निराधार बालसंगोपन अनाथ आश्रम आणि परिसरातील गरजू नागरिकांना अन्नधान्याचे वाटप पिंपरी युवासेना व आशीर्वाद महिला बचत गट यांच्यावतीने करण्यात आले. भोसरी पोलिस स्टेशनचे कर्मचारी पोलिस कॉन्स्टेबल निवास रोकडे आणि पोलिस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर भूरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी युवासेनेचे विभागसंघटक निलेश हाके, आशिर्वाद महिला संघाच्या शिला मामी जाधव, जयंती गायकवाड, नंदूभाऊ काची, महेश बोधले उपस्थित होते.






















Join Our Whatsapp Group