पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवडमध्ये संचारबंदीत रस्त्यावर मोकाट फिरणाऱ्या ८९ जणांवर बुधवारी (दि. ८) पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहे. पोलिसांनी गेल्या २१ दिवसामध्ये १ हजार ७५८ जणांवर जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.
लॉकडाऊनच्या काळात संचारबंदीचेही आदेश पोलिसांनी लागू केले आहेत. खासगी वाहनांना रस्त्यावर आणण्यास मनाई केली आहे. खासगी वाहनांना इंधनही दिले जात नाही. तरीदेखील अनेकजण रस्त्यावर विनाकारण फिरत असतात. बुधवारी शहरातील पोलिसांनी तब्बल ८९ जणांवर कारवाई केली आहे. तर गेल्या २१ दिवसांमध्ये भा. द. वि. कलम १८८ अन्वये १ हजार ७५८ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. तरीदेखील रस्त्यावर मोकाट फिरणाऱ्याच्या संख्येत घट होताना दिसत नाही.
विशेषतः सायंकाळच्यावेळी घराबाहेर पडणाऱ्यांची संख्या अधिक आहे. यामुळे सायंकाळच्यावेळी पाच ते सात वाजताच्या दरम्यान विशेष मोहिम राबवून संचारबंदीच्या आदेशाची आणखी कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी सर्व पोलीस ठाण्यांना दिले आहेत.
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत करण्यात आलेली कारवाई खालील प्रमाणे..
आळंदी -१६, तळेगाव एमआयडीसी – ०१, देहूरोड – १७, पिंपरी – ०७, भोसरी – १७, चाकण – ०३, दिघी – १९, तळेगाव दाभाडे – ०९, एकूण – ८९






















Join Our Whatsapp Group