पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरात आणखी एक ‘कोरोनाग्रस्त’ रूग्ण आढळल्याची माहिती समोर आली आहे. एका रूग्णाचे रिपोर्ट ‘पॉझिटिव्ह’ आले आहेत. त्यामुळं शहरातील ‘कोरोनाग्रस्त’ रूग्णांची संख्या आता ११ वर पोहचली आहे. तर आज पर्यंतच्या बाधित रूग्णांचा आकडा २३ झाला आहे. यापैकी १२ रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी गेले आहेत. तर उर्वरित ११ रुग्णांवर महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने दिली.
कोरोनाचे आज दि.०९ रोजी सायं. ७.३० वाजेपर्यंतचे अपडेटस् खालील प्रमाणे
रूग्णालयात आज दाखल झालेले संशयित रुग्ण – ४०
आज पॉझिटीव्ह रूग्णांची संख्या – ०२
आज निगेटीव्ह रुग्णांची संख्या – ३४
चाचणी अहवाल प्रतिक्षेतील रुग्ण संख्या – १२
रुग्णालयात दाखल रुग्ण – ४०
डिस्चार्च झालेले रुग्ण – २४
सर्वेक्षण केलेली लोकसंख्या – ७ लाख ७५ हजार ६७०






















Join Our Whatsapp Group