मावळ (Pclive7.com):- भारतीय जनता युवा मोर्चा विद्यार्थी आघाडी पुणे जिल्हा ग्रामीणच्या वतीने ‘ऑनलाईन वक्तृत्व’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती पुणे जिल्हा भाजपा विद्यार्थी आघाडी उपाध्यक्ष संस्कार चव्हाण यांनी आज एका प्रसिद्धी पञकाद्वारे दिली.
सध्या फक्त भारतातच नव्हे तर संपुर्ण जगात कोरोना या विषाणूने जे थैमान घातले आहे. त्यावरती मात करण्यासाठी सर्व राष्ट्र शर्तीचे प्रयत्न करत आहेत. या सगळ्या परिस्थितीत भारतात २१ दिवसांचे लोकडाऊन केंद्र सरकार ने जाहीर केले आहे. ही सगळी परिस्थिती डोळ्यासमोर ठेवून जरी कोरोना आजाराच्या संकट काळात संपूर्ण देश घरात असताना नागरीकांच्या कल्पनेला एक दिशा देण्यासाठी या ‘वक्तृत्व’ स्पर्धेचे आयोजन केले गेले आहे. विशेष म्हणजे ही स्पर्धा ऑनलाईन असून स्पर्धकांनी त्यांची भाषणाचा व्हिडीओ आयोजकांना whatsapp द्वारे पाठवायचा आहे. त्यामुळे कुठे ही गर्दी होणार नाही याची खबरदारी आयोजकांनी घेतली आहे. या स्पर्धेसाठी ४ विषय आयोजकांकडुन देण्यात आले आहेत. त्यामध्ये कोरोना एक वैश्विक महामारी, संघटनेचे महत्व, समर्पित व्यक्तिमत्व, अटलजी एक युगपुरूष हे विषय या स्पर्धेत आहेत. तसेच विजयी स्पर्धकांसाठी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. ह्या स्पर्धेत भाग घेण्याची शेवटची तारीख दि. २० एप्रिल ही असेल व ही स्पर्धा संपूर्ण जिल्ह्यात असेल असे आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले. या स्पर्धेचे आयोजन संस्कार चव्हाण, अनिकेत राक्षे तसेच भाजपायुमो जिल्हा विद्यार्थी आघाडीने केले आहे.
सध्याचे युग हे डिजिटल युग आहे. आणि या युगात सध्याच्या परिस्थितीला अनुसरून जगात चालु असलेले करोना या महाभयंकर आजाराच्या धरतीवर आयोजकांनी ही अभिनव ‘ऑनलाईन वक्तृत्व’ स्पर्धेचे आयोजन केले. यामुळे नागरीकांच्या विचारांना एक दिशा मिळेल.
सुदर्शन जयप्रकाश चौधरी (सरपंच तथा जिल्हाध्यक्ष भाजपा युमो)






















Join Our Whatsapp Group