पिंपरी (Pclive7.cm):- पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाग्रस्त रूग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. गेल्या चार दिवसांपासून शहरातील कोरोनाच्या रुग्णात दररोज वाढ होत आहे. कोरोना बाधिताच्या संपर्कात आलेल्या एका ४१ वर्षीय पुरुषाचे कोरोनाचे रिपोर्ट ‘पॉझिटीव्ह’ आले आहेत. यामुळे शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या १८ झाली आहे. त्यातील सक्रिय १५ रुग्णांवर महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर, ३ सक्रिय कोरोना बाधित रुग्णांवर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान आजपर्यंत एकूण ३० जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी १२ रुग्ण बरे होऊन त्यांना डिस्चार्ज दिला आहे.
पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाचा विळखा वाढत आहे. गेल्या चार दिवसांपासून शहरात दररोज कोरोनाच्या रुग्णात वाढ होत आहे. मागील चार दिवसात तब्बल ९ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. आता आणखी एका ४१ वर्षीय पुरुषाचे रिपोर्ट ‘पॉझिटीव्ह’ आले आहेत. त्यामुळे त्याला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तर, पुण्यातील रुग्णालयात नोकरीला असलेल्या आणि पिंपरी चिंचवड शहरात राहत असलेल्या नर्सचे रिपोर्ट ‘पॉझिटीव्ह’ आले होते. या नर्सवर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शनिवारी (दि.११) रोजी एकाच दिवशी शहरातील दोघांना कोरोनाची लागण झाली आहे.
दरम्यान, १२ मार्चपासून पिंपरी चिंचवड शहरातील ३० जणांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी १२ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. कोरोना बाधित सक्रिय १५ रुग्णांवर महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर, ३ सक्रिय कोरोना बाधित रुग्णांवर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.






















Join Our Whatsapp Group