पिंपरी (Pclive7.com):- देशातील पोदार स्कूल या अग्रगण्य शाळेतील प्रिन्सिपलने घरात राहुन कोरोनाशी लढा देण्याचा हेतु मनात बाळगून कोरोना आजारावर मात करण्याचा दृढनिश्चय केला असून सोशल मीडियाचा माध्यमातून नागरिकांना संदेश दिला आहे.
यात त्यांनी म्हटले आहे की, घराबाहेर पडू नका. स्वतःचे व आपल्या परिवाराचे या आजारापासुन रक्षण करा. सरकारच्या नियमांचे पालन करून अत्यावश्यक काम असेल तरचं घराबाहेर पडावं. सतत हात स्वच्छ धुवून घ्यावेत. इतरांच्या जास्त जवळ जाणं टाळावे. या आजारा संदर्भात काही लक्षण आढळून आल्यास स्वतःहून जवळपासच्या रूग्णालयात जावे. आपण सर्वजण एकत्र येवून नियमांचे पालन करू. घरात राहुन या आजाराशी लढा देऊ. सोशल मिडियावर यासंदर्भात चुकीचे मेसेज, किवा समाजात भेदभाव होईल अशा अफवा पसरवू नका, असे आवाहन केले आहे.






















Join Our Whatsapp Group