पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेचे भाजपाचे नगरसेवक शैलेश मोरे आणि देवी एज्युकेशन सोसायटी (तोतारामशेठ सुखवानी) यांच्या तर्फे पिंपरी पोलिस स्टेशनच्या प्रवेशव्दारावर ‘सॅनिटायझर टनेल’ बसविण्यात आले आहे.
पिंपरी चिंचवड शहरात दिवसेंदिवस कोरोनाच्या रूग्ण संख्येत वाढ होत आहे. महापालिकेसोबत पोलीस प्रशासनही या संकटाच्या विरोधात मैदानात उतरले आहेत. दिवसरात्र शहरातील पोलीस बांधव त्यांचा जीव धोक्यात घालून जनतेच्या रक्षणासाठी कार्यरत आहेत. सामाजिक बांधिलकीचे भान राखत भाजपा नगरसेवक शैलेश मोरे यांनी पोलीस बांधवांना कोरोनाचा संभाव्य धोका रोखण्यासाठी पाऊल उचलले आहे. पिंपरी पोलिस स्टेशनच्या प्रवेशव्दारावर नगरसेवक शैलेश मोरे आणि देवी एज्युकेशन सोसायटी (तोतारामशेठ सुखवानी) यांच्या तर्फे ‘सॅनिटायझर टनेल’ स्ववखर्चाने बसविण्यात आले आहे.



















Join Our Whatsapp Group