पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाचे रूग्ण दिवसेंदिवस वाढत असताना काहीसा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. शहरातील भोसरी परिसरात राहणारे ४ जण आज (दि.२६) ‘कोरोनामुक्त’ झाल्याने त्यांंना डिस्चार्ज देण्यात आला असून आजपर्यंत पूर्णपणे बरे झालेल्या रूग्णांची संख्या २८ झाली असल्याची माहिती महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने दिली.
पिंपरी चिंचवड शहरात आज दि.२६ रोजी कोरोना पॉझिटिव्ह एक रूग्ण आढळला आहे. मोशी येथील १९ वर्षीय तरूणीचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या कोरोनाबाधित रूग्णांची संख्या ८५ वर पोहचली आहे. तर आज ४ रूग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आले आहे. त्यामुळे कोरोनामुक्त झालेल्यांचा आकडा २८ झाला आहे. तसेच पिंपरी चिंचवडमध्ये आजपर्यंत ४ रूग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला असून ४५ रूग्णांवर शहरातील रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी दिघीतील काही भाग आज रात्री ११ वाजल्यापासून सील करण्यात येणार आहे. दिघी येथील कोकण मराठा संघ गृह – सौंदर्य ब्युटी पार्लर – शहिद भगतसिंग मार्ग – त्रिमुर्ती सुपर मार्केट – श्रीशिवशंकर अपार्टमेंट – कोकण मराठा संघ गृहचा परिसर आज मध्यरात्री ११ वाजलेपासून पुढील आदेशापर्यंत सील करण्यात येत आहे. सदर परिसराच्या हद्दींमध्ये पुढील आदेशापर्यंत प्रवेशबंदी व परिसरातून बाहेर पडण्यास नागरिकांना बंदी केलेली आहे. सील केलेल्या परिसरातील प्रत्येक नागरिकाने तोंडाला मास्क लावणे बंधनकारक आहे.






















Join Our Whatsapp Group