पिंपरी (Pclive7.com):- विजयनगर झोपडपट्टी, चिंचवड येथे अक्षय चव्हाण युवामंच आयोजित कोरोना जनजागृती अभियान उपक्रम राबविण्यात आला आहे. येथे जागोजागी हॅंडवाॅशने स्वच्छ हात धुण्याची व वारंवार हॅंडवाॅश रिफील करण्याची सोय करण्यात आली आहे. या परिसरात दाटवस्ती असल्याने काही घरे ओलांडून आत जावे लागते. त्यामुळे नागरिकांनी बाहेरुन आल्यानंतर बाहेरच्या बाहेरचं स्वच्छ हात धुवून आत जावे. कोरोना विषाणूंचा संसर्ग रोखण्यासाठी आपण स्वत:ची व इतरांची काळजी घ्यावी हेच या उपक्रमाचे उद्दीष्ट आहे.
या उपक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी अक्षय विलास चव्हाण आणि त्यांचे सहकारी बाळु अडागळे, गणेश गायकवाड, आदित्य गवळी, उमेश कांबळे, रोहन मगर, सुनिल म्हेत्रे होते. नागरिकांनी या उपक्रमास पुरेपूर प्रतिसाद दिला असून या उपक्रमाचे कौतुक होत आहे.






















Join Our Whatsapp Group