पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवडमध्ये आज (दि.०४) तीन जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील १ रुग्ण चऱ्होली भागातील आहे. तर इतर दोन रूग्ण पुणे परिसरातील आहेत. तसेच आज २ रुग्ण ‘कोरोनामुक्त’ झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरात सध्या ५५ कोरोनाचे रुग्ण असून आजपर्यंतच्या रूग्णांची संख्या १२४ वर पोहचली आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेने प्रसिद्धीस दिलेल्या अहवालानुसार कोरोनाची लागण झालेले शहरात आतापर्यंत १२४ रुग्ण आढळले आहेत. त्यातील ५५ रुग्ण योग्य उपचार घेऊन कोरोनावर मात करत आपापल्या घरी परतले आहेत. आतापर्यंत ५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यातील दोन रुग्ण हे पिंपरी-चिंचवड शहराचे रहिवासी नाहीत. सध्या शहरात एकूण ५५ कोरोना रुग्ण आहेत. आज सोमवारी शहरातील एका नागरिकाला कोरोनाची लागण झाली आहे. हा रुग्ण चऱ्होली भागातील आहे. तसेच कासारवाडी आणि खराळवाडी येथील रहिवासी असलेले दोन रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे.
दरम्यान, कोरोना रुग्ण आढळल्यामुळे चऱ्होलीतील चऱ्होली बुद्रुक रोड, हायस्कूल रोड, हिंदवी एंटरप्रायजेस, रोहन झेरॉक्स सेंटर हा परिसर तसेच पिंपळेगुरव येथील भक्ती दर्शन सोसायटी, पुष्पांजली अपार्टमेंट, पाण्याची टाकी, काटेपुरम चौक, कृष्णा चौक, अखिल क्रांती चौक, एम. के. चौक, शिंदेशाही हॉटेल, भक्ती दर्शन सोसायटी हा परिसर आज सोमवार रात्री अकरा वाजल्यापासून पुढील आदेशापर्यंत सील करण्यात येणार आहे. या भागात बाहेरच्या व्यक्तीला प्रवेश बंदी आणि आतील व्यक्तीला घराबाहेर पडण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच अत्यावश्यक कारणांसाठी घराबाहेर पडल्यास तोंडाला मास्क लावणे बंधनकारक करण्यात आले आहे.






















Join Our Whatsapp Group