पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरातील चिंचवड स्टेशन परिसरात ३ जण आणि पुणे वाकडेवाडी येथील एकाचे कोरोनाचे आज (दि.०७) सकाळचे रिपोर्ट ‘पॉझिटिव्ह’ आले आहेत. या सर्व रूग्णांना वायसीएममध्ये दाखल केले असून उपचार सुरु असल्याची माहिती महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने दिली.
पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाच्या रूग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. आज चिंचवड स्टेशन परिसरातील ३ आणि वाकडेवाडी पुणे येथील एका महिलेचे अशा चार जणांचे रिपोर्ट ‘पॉझिटीव्ह’ आले आहेत. यामुळे सध्या शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या ७५ झाली आहे. तर, आजपर्यंत शहरात १४७ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी आत्तापर्यंत ६० जण ‘कोरोनामुक्त’ झाले असून सात जणांचा मृत्यू झाला आहे. आज बाधित आलेले रूग्ण हे चिंचवड स्टेशन येथील रहिवीसी आहेत. त्यातील पुरूषांचे वय अनुक्रमे (२,१८,३०) असून महिलेचे वय ३२ वर्षे आहे. तर, पुण्यातील वाकडेवाडी येथील २८ वर्षीय महिलेचेही रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत.






















Join Our Whatsapp Group