पिंपरी (Pclive7.com):- एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असताना पिंपरी चिंचवडकरांना दिलासा देणारी एक बातमी समोर आली आहे. शहरातील सर्वाधिक रूग्ण आढळलेल्या निगडी रुपीनगरमधील तीन वर्षाच्या दोन मुलींसह सहा पुरुष आणि भोसरी, मोशीतील सात जण असे १५ रुग्ण आज (दि.०८) एकाच दिवशी ‘कोरोनामुक्त’ झाले आहे. पूर्णपणे बरे झाल्यामुळे या सर्व रूग्णांना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजपर्यंत शहरातील ७६ रूग्ण ‘कोरोनामुक्त’ झाले आहेत.
निगडी रुपीनगर परिसरातील एका २६ वर्षाच्या तरुणाला २३ एप्रिल रोजी कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या नागरिकांना कोरोनाची लागण झाली होती. ही रुग्ण सख्या सुमारे ३० हून अधिकवर पोहचली होती. येथील लहान मुलांना देखील कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे संपूर्ण शहराचे लक्ष रूपीनगर परिसराकडे लागले होते. दरम्यान आज येथील ८ रूग्ण कोरोनामुक्त झाले आहे. तसेच मोशी परिसरातील ७ रूग्ण पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना देखील डिस्चार्ज देण्यात आला आहे.
दरम्यान आज दिवसभरात ताम्हाणेवस्ती चिखली, मोशी, जुनी सांगवी परिसरातील ४ जण तसेच ताडीवाला रोड पुणे येथील एकाचे रिपोर्ट ‘पॉझिटिव्ह’ आल्याने त्यांना वायसीएम रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.






















Join Our Whatsapp Group