पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महपालिका अधिकारी व कर्मचारी वर्गास तातडीने ७ वा वेतन आयोग लागू करण्याबाबततची मागणी आमदार अण्णा बनसोडे यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
नागपूर येथे विधिमंडळाचे अधिवेशन सुरु असताना आमदार अण्णा बनसोडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे राज्य शासनाच्या नगर विकास विभागाने महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांना ७ वा वेतन आयोग लागू करण्याबाबतची मान्यता देत असल्याचा आदेश दि. २०.१२.२०१९ रोजी दिला होता. राज्य शासनाने मनपा अधिकारी व कर्मचारी वर्गास ७ वा वेतन आयोग लागू करण्यास काही अटींवर मान्यता दिलेली होती. शासनाने ज्या अटींवर पिंपरी चिंचवड मनपास ७ वा वेतन आयोग लागू करण्यास परावानगी दिली त्याच अटीवर नवी मुंबई महापालिकेस देखील ७ वा वेतन आयोग लागू करण्यास मान्यता दिलेली आहे. नवी मुंबई मनपाने त्यांच्या कर्मचाऱ्यांना ७ वा वेतन आयोग लागू केला असून पिंपरी चिंचवड महापालिका अधिकारी व कर्मचारी वर्गास मात्र ७ वा वेतन आयोग अद्याप लागू झाला नाही. तरी पिंपरी चिंचवड महपालिका अधिकारी व कर्मचारी वर्गास तातडीने ७ वा वेतन आयोग लागू करण्याची कार्यवाही करावी अशी मागणी आमदार अण्णा बनसोडे यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.























Join Our Whatsapp Group