पिंपरी (Pclive7.com):- कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर तसेच प्रशासनाने शहरातील झोपडपट्टी परिसरात अधिक लक्ष देण्याचे खरी गरज असल्याची मागणी मातोश्री सामाजिक संस्थेचे अध्यक्ष गणेश आहेर यांनी केली आहे.
यासंदर्भात गणेश आहेर यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, झोपडपट्टी परिसर हा दाट वस्ती असणारा परिसर असल्यांने त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत असल्याचं चिञ संपूर्ण शहरातील झोपडपट्टी व दाट वस्ती असणारे भागात दिसून येत आहे. महिला, लहान मुले तसेच नागरीक मोठ्या प्रमाणात मास्क न वापरता त्या ठिकाणी घराबाहेर वावरत आहेत. हा सर्व प्रकार अत्यंत गंभीर असून प्रशासनाने त्याकडे लक्ष घालण्याची अत्यंत गरज असल्याचे मत गणेश आहेर यांनी व्यक्त केले आहे.
झोपडपट्टी परिसरात सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात आल पाहिजे. अन्यथा कोरोनाच्या संकटात वाढ होवू शकते. त्यामुळे प्रशासनाने दखल घेवून ह्या ठिकाणची परिस्थिती लक्षात घेवून पावले टाकावीत आशी मागणी गणेश आहेर यांनी केली आहे.























Join Our Whatsapp Group