पिंपरी (Pclive7.com):- मागील दोन दिवसांपासून महाराष्ट्र प्रदेश एनएसयुआयचे उपाध्यक्ष उमेश खंदारे दिवसरात्र पुण्यातील लडाखच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या राज्यात पाठवण्यासाठी अथक प्रयत्न करीत होते, आज अखेर ती गोष्ट पूर्णत्वास नेली व स्वारगेट येथून त्यांची रवानगी ३ बस मधून लदाखला करण्यात आली.
या सगळ्या धावपळीत जिल्हा प्रशासनातील उपजिल्हाधिकारी नीता शिंदे , तहसीलदार विवेक जाधव आणि तहसीलदार तृप्ती कोलते पाटील व पोलिसांचे विशेष सहकार्य लाभले. अखेर या विद्यार्थ्यांना स्वारगेट येथून निरोप देण्यात आला. यावेळी त्यांना निरोप देण्यासाठी एनएसयुआयचे प्रदेशाध्यक्ष अमिरभाई शेख तसेच पुणे जिल्हाध्यक्ष भूषण रानभरे यांच्यासह संपूर्ण एनएसयुआय टीम उपस्थित होती.
महाराष्ट्र प्रदेश एनएसयुआयचे प्रदेश उपाध्यक्ष उमेश खंदारे यांच्याकडून आतापर्यंत जवळजवळ ९०० विद्यार्थ्यांना विविध राज्यात तसेच जिल्ह्यात प्रवास करण्यासाठी ई-पास काढण्यासाठी व त्यांना लागणारी इतर मदत करण्यात आली. त्यांच्या या कामाची दखल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कडून सुद्धा घेण्यात आली असून पुढील कामासाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.