पिंपरी (Pclive7.com):- पिंपळे सौदागर येथील प्लॅनेट मिलेनियम मागील बाजू ते स्पॉट १८ पर्यंतच्या १८ मीटर नोन डीपीच्या रस्त्याचे काही वर्षापूर्वी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले होते. परंतु लष्कराने अडवल्यामुळे या रस्त्याचे काम रखडले होते. परंतु आता लष्कराने या रस्त्याच्या कामाला परवानगी दिल्यामुळे आज स्मार्ट सिटी अंतर्गत स्टॉर्म वॉटरच्या लाईन टाकण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी या कामाच्या ठिकाणी भेट देऊन कामाची पाहणी केली. व या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करून नागरिकांना रहदारीसाठी रस्ता खुला करण्यात यावा अशा सूचना केल्या. यावेळी स्मार्ट सिटीचे उपभियंता लक्ष्मीकांत कोल्हे,कनिष्ठ अभियंता नरेश जाधव, बी.जी.शिर्के कंपनीचे श्री.चव्हाण आदी उपस्थित होते.























Join Our Whatsapp Group