पिंपरी (Pclive7.com):- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील बंद करण्यात आलेली नागरिक सुविधा केंद्र पुन्हा सुरू करण्यात यावेत अशी मागणी भाजपा नगरसेवक संदीप वाघेरे यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.
आयुक्तांना दिलेल्या निवेदनात वाघेरे म्हणाले की, महापालिकेच्या ३२ प्रभागामध्ये एकूण ६९ नागरी सुविधा केंद्र सुरू करण्यात आलेले होते. परंतु कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेच्या वतीने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ही नागरी सुविधा केंद्र तात्पुरत्या स्वरुपात बंद करण्यात आली होती. या नागरी सुविधा केंद्रामार्फत आग्निशामक, आकाशचिन्ह परवाना, वृक्षसंवर्धन, जलनिससारण, पाणीपुरवठा, नवीन नळजोड, रहिवासी दाखला, तसेच महापालिकेच्या नागरवस्ती विकास योजना आणि महिला व बालकल्याण योजनेअंतर्गत विविध कल्याणकरी योजना राबविल्या जातात. परंतु लॉकडाउनच्या काळामध्ये नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय झाल्याचे दिसून आलेले आहे. लॉकडाउनच्या काळामध्ये महापालिकेच्या वतीने राबविण्यात आलेल्या बर्याचश्या उपाययोजना याच नागरी सुविधा केंद्रामार्फत आपण पोहचू शकलो असतो. शहरातील नागरिकांनाही याचा लाभ घेता आला असता. तसेच महापालिकेचे उत्पन्न देखील वाढीस देखील हातभार लागला असता. आता शहरातील लोक डॉन मध्ये बऱ्याच प्रमाणात शिथिलताााा देण्यात आली आहे त्यामुळे ही नागरी सुविधा केंद्र्र पुन्हा सुरु करण्यात यावेत अशी मागणी नगरसेवक संदीप वाघेरे यांनी केली आहे.























Join Our Whatsapp Group