पिंपरी (Pclive7.com):- लॉकडाऊनमध्ये काहीशी शिथिलता येताच शहरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. भोसरीमधील मोशी परिसरात शिव रस्त्यावर असलेल्या प्रिन्सविले सोसायटीतील इंद्रायणी मेडीकलच्या दुकानावर चोरट्यांनी डल्ला मारला आहे. मंगळवारी (दि.२६) रात्री अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटून ३९ हजार किंमतीचा मुद्देमाल लंपास केला आहे.
याप्रकरणी मेडीकलचे मालक संध्या यतीन देशमुख (रा.दिघी रोड, भोसरी) यांनी अज्ञात आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, संध्या यतीन देशमुख यांचे मोशी येथील शिव रस्त्यावरील प्रिन्सविले सोसायटीमध्ये तळ मजल्यात मेडीकलचे दुकान आहे. बुधवारी रात्री नेहमीप्रमाणे त्या व त्यांचे पती मेडीकल बंद करून घरी गेले होते. त्यानंतर अज्ञात चोरट्यांनी रात्रीत दुकानाचे शटर उचकटून कॅश काऊंटरमधील ३५ हजाराची रोकड आणि चॉकलेट, डिओ, परफ्युम, हेअर ऑईल आदी सुमारे ४ हजार किंमतीच्या वस्तू असा एकूण ३९ हजार रूपयांचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलीसांत गुन्हा दाखल केला असून सहाय्यक पोलीस फौजदार आर.एस.ढेंगळे पुढील तपास करत आहेत.























Join Our Whatsapp Group