पिंपरी (Pclive7.com):- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्तांनी शहरातील नागरिकांनी बाहेर फिरताना तोंडाला मास्क वापरणे बंधनकारक केले आहे. मास्क न वापरणाऱ्यांवर ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयाकडून कडक कारवाई करण्यात आली. आज (दि.28) अखेर 200 जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून तब्बल 1 लाख रूपये इतका दंड वसूल करण्यात आला आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या आदेशानुसार पिंपरी चिंचवड महापालिका ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयाने धडक कारवाई सुरू केेली आहे. प्रभाग क्र.24 मध्ये आज दिनांक 28 पर्यंत डांगे चौक येथे 200 नागरिकांना मास्क न लावणे बाबत कारवाई केली असून 1 लाख रुपये शासकीय दंड वसूल झाला आहे. ही कारवाई ‘ग’ क्षेत्रीय अधिकारी स्मिता झगडे, सहाय्यक आरोग्य अधिकारी संजय कुलकर्णी, मुख्य आरोग्य निरीक्षक राजु बेद यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. ही कारवाई प्रभाग क्रमांक 24 चे आरोग्य निरीक्षक एस.बी.चन्नाल, आरोग्य मुकादम दिलीप खताळ, कर्मचारी अभय दारोळे, प्रशांत पवार, अरुण राऊत, राजू जगताप, सूर्यकांत चाबुकस्वार, वजीर सौदागर यांच्या पथकामार्फत करण्यात आली.























Join Our Whatsapp Group