पिंपरी (Pclive7.com):- शिवसेना पक्षप्रमुख, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांच्या आदेशानुसार व युवासेना प्रमुख पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना यमुनानगर विभागाच्या वतीने स्वातंत्रवीर सावरकर यांच्या जयंती निमित्त आयोजित रक्तदान शिबिरात ६३ रक्तदात्यांनी रक्तदान केले. प्रत्येक रक्तदात्यांना एन 95 मास्क व गोदरेज, लाईफ बॉय कंपनीचे सॅनिटायझर देण्यात आले. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वायसीएम रुग्णालयाच्या रक्तपेढीच्या सहकार्याने डॉ.सौ. लोंढे, कौंसिलर आम्रपाली गायकवाड व त्यांच्या टीमनेया साठी योगदान दिले.
यावेळी सुमारे १०४ रक्तदात्यांनी पुन्हा १९ जून शिवसेना वर्धापन दिनाच्या दिवशी आयोजित करण्यात येणाऱ्या रक्तदान शिबिरात रक्तदान करण्यासाठी नांव नोंदणी केली. या रक्तदान शिबिराचे आयोजन शिवसेना जिल्हा संघटिका सुलभाताई उबाळे, भारतीय विद्यार्थी सेनेचे माजी शहर प्रमुख रामभाऊ उबाळे यांच्या नेतृत्वाखाली विभागप्रमुख सतीश मरळ देशमुख, उपविभाग प्रमुख गणेश इंगवले, अंकुश जगदाळे, संजयशेट बोऱ्हाडे, युवानेते अजिंक्य उबाळे, शाखाप्रमुख महेश डोके, चवडडप्पा तलवार, कौस्तुभ गोळे, पावन मारुती मंडळाचे अध्यक्ष जयंतराव बरशेट्टी, जेष्ठ नागरिक संघांचे शहर उपाध्यक्ष गजानन ढमाले, सुभाष सराफ, नितीन बोन्डे मछिंद्र महाकाळ, भरत डोके, अरुण बांद्रे, मिलिंद कोंढाळकर, प्रदीप बेळगावकर, किशोर शिंदे, सागर गोलांडे, आण्णा रसाळ, ओम परदेशीं, गणेश गाडे, संतोष गायकवाड, संजय गाडवे, पांडुरंग पोवार, नारायण कोरवी, अनिकेत येरुणकर, सार्थक दोषी, गणेश सस्ते वैभव सस्ते, लोकेश मुचुनडीकर,अविनाश हरिहर, विवेक गवळी, सामाजिक कार्यकर्ते दीपक खैरनार, सूरज दण्डर, मुलचंद मणेरे यांनी शिबीर यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.
























Join Our Whatsapp Group