पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाच्या रूग्णांत वाढ सुरूच सुरूच आहे. शहरातील इंदिरानगर, चिंचवड स्टेशन, भाटनगर, रुपीनगर, पिंपरी, बौध्दनगर, वाल्हेकरवाडी, दत्तनगर परिसरातील ११ जणांचे रिपोर्ट आज (दि.३१) ‘पॉझिटीव्ह’ आलेत तर १३ रुग्ण ‘कोरोनामुक्त’ झाले आहेत. शहरातील आजपर्यंतच्या कोरोना बाधितांचा आकडा ५२२ वर पोहचला असून २६२ जण ‘कोरोनामुक्त’ झाले आहेत. तर, शहरातील ८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून एकूण वीस जणांचा आजपर्यंत मृत्यू झाला असल्याची माहिती महापालिकेच्या वैद्यकीय विभागानेेे दिली आहे.
महापालिकेने काल कोरोना संशयितांचे नमुने तपासणीसाठी पाठविले होते. त्याचे रिपोर्ट आज आले आहेत. त्यामध्ये इंदिरानगर, चिंचवड स्टेशन, भाटनगर, रुपीनगर, पिंपरी, बौध्दनगर, वाल्हेकरवाडी, दत्तनगर परिसरातील ११ जणांचे रिपोर्ट ‘पॉझिटीव्ह’ आहेत. त्यामध्ये ३ पुरुष आणि ८ महिलांना कोरोनाची लागण झाली आहे. तर, आनंदनगर, दिघी, खडकी, ताडीवाला रोड, आंबेगाव येथील १३ जण आज ‘कोरोनामुक्त’ झाले आहेत. त्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
महापालिका रुग्णालयात २२० सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आजपर्यंत शहरातील ५२२ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यापैकी २६२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर, शहरातील ३२ बाधित रुग्णांवर महापालिका हद्दीबाहेरील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शहरातील ८ आणि शहराबाहेरील पण महापालिका रुग्णालयात उपचार घेणा-या १२ अशा २० जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
🚨 पिंपरी चिंचवड कोरोना अपडेट्स 🚨
रविवार दि.३१ मे २०२०
📲 अपडेट्स सायं ४.३० वाजेपर्यंतचे 📲
🛡️ आजपर्यंत एकूण कोरोना पॉझिटीव्ह = ५२२
🛡️ आज वाढलेले पॉझिटिव्ह रूग्ण = ११
🛡️ आज Pcmc बाहेरिल पॉझिटिव्ह रुग्ण = ००
🛡️ सध्या Pcmc मधील कोरोना रूग्ण = २२०
🛡️ एकूण मृत संख्या = २० (Pcmc ०८ + १२ शहराबाहेरील)
🛡️ एकूण कोरोनामुक्त रूग्ण =२६२ (आज १३ रूग्ण डिस्चार्ज)
🛡️ आज दाखल संशयित रूग्ण = ५०
🛡️ आज तपासणीत निगेटिव्ह रूग्ण = १०९
🛡️ प्रतिक्षेतील अहवाल = १८८
🛡️ आज होम क्वारंटाईन = ४९७ (एकूण = १४३१०)🛡️ दैनंदिन सर्व्हेक्षण = ७३८५४
🚨 आज पॉझिटिव्ह आलेले रुग्ण हे इंदिरानगर, चिंचवड स्टेशन, भाटनगर, रुपीनगर, पिंपरी, बौध्दनगर, वाल्हेकरवाडी, दत्तनगर येथील रहिवासी आहेत.
⛔ आज आनंदनगर, दिघी, खडकी, ताडीवाला रोड, आंबेगाव येथील रहिवासी असलेले रूग्ण कोरोनामुक्त झाल्याने डिस्चार्ज देण्यात आला आहे.






















Join Our Whatsapp Group