मुंबई (Pclive7.com):- बॉलीवूडला अनेक प्रसिद्ध गाणी देणा-या साजिद-वाजिद या संगीत दिग्दर्शक जोडी तुटली आहे. प्रसिद्ध संगीतकार वाजिद खानं यांचं वयाच्या ४२ व्या वर्षी निधन झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून वाजिद आजारी होते. गेल्या काही दिवसांपासून चेंबूरमधील सुराना रूग्णालयात वाजिद यांच्यावर उपचार सुरू होते. प्रकृती खालावल्यामुळे काही दिवसांपासून त्यांना व्हेन्टिलेटरवर ठेवण्यात आल्याचे, असे संगीतकार सलीम मर्चंट यांनी सांगितले. गेल्या काही वर्षांपासून वाजिद यांना आरोग्याच्या खूप समस्या होत्या.
वाजिद यांना किडनीची समस्या होती. त्यामुळे दोन वर्षांपूर्वी त्यांच्यावर किडनी प्रत्यारोपन शस्त्रक्रियाही करण्यात आली होती. काही दिवसांपूर्वी किडनीमध्ये इन्फेक्शन झाल्याने चार दिवसांपासून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते, असे मर्चंट यांनी पीटीआयला सांगितले.
१९९८ मध्ये साजिद-वाजिद या जोडगोळीने सलमान खानच्या प्यार किया तो डरना क्या या चित्रपटाला संगीत देऊन आपल्या करिअरची सुरूवात केली होती. त्यानंतर सलमान खान याच्या गर्व, तेरे नाम, तुमको ना भूल पाएंगे, पार्टनर, दबंग सारख्या चित्रपटांची गाणी लिहली, गायली शिवाय संगीतही दिले. सिनेमांच्या गाण्यांची रचना केली होती. ईदच्या दिवश रिलिज झालेले सलमान खान याचे प्यार करोना आणि भाई भाई गाणेही साजिद-वाजिद जोडीने कंपोज केले होते. त्यांच्या करियरचे ते शेवटचं गाणं ठरलं आहे.
बॉलिवूडमधील प्रसिद्ध संगीतकाराचे निधन झाल्यामुळे बॉलिवूडमध्ये दुख:द वातावरण आहे. प्रियंका चोप्रा, वरूण धवन आणि प्रणिती चोप्रा यांच्यासह अनेक कलाकारांनी दुख व्यक्त केलं आहे.























Join Our Whatsapp Group