पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाने सातशेचा आकडा पार केला आहे. आतापर्यंतच्या कोरोना बाधितांची संख्या ७०८ वर पोहचली असून आज (दि.०६) शहरात दिवसभरात ३० रूग्ण ‘पॉझिटिव्ह’ आढळले आहेत. तर हद्दी बाहेरिल ०८ कोरोनाग्रस्त रूग्ण शहरातील रूग्णालयात दाखल झाले आहेत. दरम्यान आज ३६ रूग्ण कोरोनामुक्त झालेत. तर आंबेगांव येथील ६४ वर्षीय व्यक्तीचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला असून शहरात सध्या २५१ बाधित रूग्ण आहेत.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज (दि.०६) दिवसभरात शहरातील ३० जणांचे रिपोर्ट ‘पॉझिटिव्ह’ आले आहेत. तर हद्दीबाहेरिल आठ बाधित रूग्ण शहरातील रूग्णालयात दाखल झाले आहेत. आज ‘पॉझिटिव्ह’ आलेले रूग्ण आनंदनगर, पिंपळेगुरव, बौध्दनगर, सांगवी, भाटनगर, बॉईज हॉस्टेल वाय.सी.एम. हॉस्पिटल, अजिंठानगर, गुरुदत्तनगर पिंपरी, लिंकरोड पिंपरी, जनतानगर चिंचवड, रुपीनगर, दत्तनगर वाकड, चिंचवड, आनंदपार्क निगडी, खराळवाडी, दापोडी, खेड, जुन्नर, डेक्कन पुणे, येरवडा, शिवाजीनगर, देहूरोड व चाकण येथील रहिवासी आहेत. त्यामुळे शहरातील आजपर्यंत कोरोनाबाधितांची संख्या ७०८ वर पोहचली आहे.
तसेच आज आंबेगाव येथील ६४ वर्षीय व्यक्तीचा वायसीएम रूग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. आजपर्यंत शहरात २९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून त्यात शहरातील १२ रूग्णांचा समावेश आहे. दरम्यान दिलासादायक गोष्ट म्हणजे शहरातील ७०८ कोरोना बाधित रूग्णांपैकी ४३७ रूग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. त्यात आज डिस्चार्ज दिलेल्या ३६ रूग्णांचा देखील समावेश आहे. आज भोसरी, आनंदनगर, वाकड, बौध्दनगर, पिंपरी, किवळे, भाटनगर, अशोकनगर पिंपरी, दापोडी, कासारवाडी, आंबेगांव, खेड व शिक्रापूर येथील रहिवासी असलेले रूग्ण कोरोनामुक्त झाल्याने डिस्चार्ज देण्यात आला आहे.























Join Our Whatsapp Group