पिंपरी (Pclive7.com):- काळेवाडी येथील कोकण खेड युवाशक्तीच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेक सोहळा दिनाचे औचित्य साधत भव्य रक्तदान शिबिर संपन्न झाले. या रक्तदान शिबिरात ४५ जणांनी रक्तदान केले. काळेवाडी येथील लाईफ लाईन हॉस्पिटल थेरगाव यांच्या माध्यमातून आयोजन करण्यात आले होते.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रक्तदान शिबीराची आवश्यकता व राज्यात रक्ताचा तुटवडा होऊ नये यासाठी रक्तदानाचे आव्हान केले होते. त्याला प्रतिसाद देत कोकण खेड युवाशक्तीने स्वच्छ वातावरणात, गर्दी टाळत अनोख्या पध्दतीने रक्तदान शिबिर पार पडले. या शिबीरात सहभागी झालेल्या प्रत्येकास अर्सेनिक अल्बम ३० गोळ्या व मास्क देण्यात आले. तसेच युवाशक्ति मार्फ़त प्रत्येक रक्तदात्यास कोविड १९ योद्धा पत्रक देऊन सन्मानित करण्यात आले. या रक्तदान शिबिरात ४५ जणांनी रक्तदान केले.
या शिबिराचे उद्घाटन वाकड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीक व निगडी पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुहास घाडगे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला नगरसेविका सुजाता पालांडे, नगरसेवक निलेश बारणे, माजी नगरसेवक जितेंद्र ननावरे, प्रमोद ताम्हणकर, शहर भाजपाचे उपाध्यक्ष अजय पाताडे, गजानन मोरे – युवक अध्यक्ष- कोकण विकास महासंघ, प्रकाश यादव – पत्रकार,अध्यक्ष स्वराज्य कोकण पुणे, साधना मुंडे – समाज प्रबोधनकार, सुनिता चव्हाण, डॉ. किरण थोरात, त्याचप्रमाणे युवाशक्तिचे अध्यक्ष संजय मोरे, अरूण यादव, संदीप साळुंखे, रुपेश कदम, संदीप सपकाळ सर, संदीप कदम सर, अभिजित कदम, रुपेश मोरे, राज कदम, अंकुर चव्हाण, अक्षय मोरे, अनिल पालांडे, अनिल कोकिरकर, अरुण यादव, निलेश कदम, विनोद यादव, अनिल मोरे, आनंद ढानक, सागर शिंदे, सुनील शिंदे, अमृत जाधव, संदीप जंगम, महेश गोरे, राहुल ढेबे, मंगेश घाग, शशांक कदम, व युवाशक्तीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
























Join Our Whatsapp Group