वडगाव मावळ (Pclive7.com):- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २१ व्या वर्धापनदिनानिमित्त मावळ तालुक्यात अनेक ठिकाणी रक्तदान शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत. वर्धापन दिनी कार्यकर्त्यांनी रक्तदान करण्याचे आवाहन पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी केले होते. त्यानुसार मावळचे आमदार सुनील शेळके यांनी स्वतः आज वडगाव मावळ येथील शिबिरात रक्तदान केले.
रक्तदान हे आपलं सामाजिक कर्तव्य आहे. रक्तदान हे नि:स्वार्थ भावनेनं केलं पाहिजे. कारण आपल्या एका रक्तदानातून कुणाला तरी जीवदान मिळणार आहे याची जागरुकता समाजात वाढविली पाहिजे. एक रक्तदाता म्हणून मला सांगायला आवडेल, की रक्तदानासंबंधी काहीजणांच्या मनात जी भीती असते ती तुम्ही प्रत्यक्ष रक्तदान केल्यावरच जाऊ शकते. रक्तदानासारखं कोणतंही श्रेष्ठ दान नाही. त्याचा आनंद प्रत्येकानं घ्यायला हवा असे मला वाटते असे मत मावळचे आमदार सुनील शेळके यांनी यावेळी व्यक्त केले.
























Join Our Whatsapp Group