पिंपरी (Pclive7.com):- देशातील कोरोना महामारीच्या संकट काळात कुठल्याही रुग्णांना रक्त कमी पडू नये त्यामुळे इतर कार्यक्रम रद्द करून विविध ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करून वर्धापनदिन साजरा करावे. असे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले होते. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या मार्गदर्शनाखाली नाना काटे सोशल फाऊंडेशन व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या संयुक्त विद्यमानाने पिंपळे सौदागर महादेव मंदिर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे, नगरसेविका शितलताई काटे, माजी नगरसेवक सतीश दरेकर, राजेंद्र साळुंखे, शंकर काटे, शिक्षण मंडळाचे माजी सभापती फजल शेख, युवक अध्यक्ष विशाल वाकडकर, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष सुनील गव्हाणे, राष्ट्रवादी युवती अध्यक्षा वर्षा जगताप, महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस विशाल काळभोर, व्यापारी सेल अध्यक्ष प्रदिप गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सेवादल सेलचे महेश झपके, राष्ट्रवादी काँग्रेस सेवादलाचा शहर संघटीका सुप्रिया साळवी (काटे), राष्ट्रवादी असंघटीत कामगार सेलच्या मीना मोहिते, मनीषा खराडे, शिवशंभो सेवा मंडळाचे अध्यक्ष संपत मेटे, व ग्रामस्थ, इत्यादी मान्यवर उपस्थित होते. डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल पिंपरी येथील रक्तपेढीचे डॉक्टर्स व नर्स यांच्या टीमने सहकार्य केले. यावेळी 78 नागरिकांनी रक्तदान केले. रक्तदात्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देण्यात आले. व अशा कोरोना सारख्या संकटाचा काळात उस्फूर्त प्रतिसाद देत एवढा मोठ्या प्रमाणात रक्तदान केल्याबद्दल रक्तदात्याचे विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे व नगरसेविका शितल नाना काटे यांनी आभार व्यक्त केले.























Join Our Whatsapp Group