पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या रावेत जलसा केंद्रातील उच्चदाब नलिकेतून पाण्याची गळती झाली आहे. दुरुस्तीच्या कामामुळे शहरातील काही भागांचा पाणीपुरवठा गुरुवार दि.११ रोजी कमीदाबाने तसेच उशिराने व विस्कळीत होईल अशी माहिती पाणी पुरवठा विभागाने दिली आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या रावेत येथील जलउपसा केंद्रातील टप्पा क्र.२ च्या उच्चदाब नलिकेतून पाण्याची गळती होत आहे. सदर गळतीची दुरुस्ती करणेकामी गुरुवार दि.११ रोजी सकाळी १० वाजल्यानंतर टप्पा क्र.२ च्या उच्चदाब नलिकेचे पंपिंग बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे चिंचवड, बिजलीनगर, पिंपरीनगर, पिंपरीगाव, जुनी सांगवी, नवी सांगवी, पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर, दापोडी आदी भागातील त्या दिवसाचा संध्याकाळचा पाणीपुरवठा उशिराने, कमी दाबाने व विस्कळीत होईल. सदरच्या गळतीची दुरुस्ती लवकरात लवकर करून पाणीपुरवठा सुरळीत करण्याचा विभागाचा प्रयत्न आहे. तरी, नागरिकांनी उपलब्ध पाणी जपून वापरुन महानगरपलिकेस सहकार्य करावे असे आवाहन पाणी पुरवठा विभागाने केले आहे.























Join Our Whatsapp Group