पिंपरी (Pclive7.com):- बिजलीनगर येथील मातृसेवा या संस्थेला एसकेएफ गणेश मंडळाच्यावतीने संकष्ट चतुर्थीच्या दिवशी पाण्याची टाकी भेट देण्यात आली.
मातृसेवा संस्थेला पिण्याच्या पाण्याची टाकीची गरज होती. एसकेएफ गणेश मंडळला त्यांनी मदतीसाठी मागणी केली होती. संकष्टी चतुर्थीचे औचित्य साधून एसकेएफ गणेश मंडळाकडून ही पाण्याची टाकी देण्यात आली. मातृसेवा संस्थाकडून गणेशमंडळाचे आभार मानण्यात आले. यावेळी मंडळाचे सभासद नाथा चव्हाण, देवेंद्र घोडके, सुहास शहा, सय्यद मामा व तसेच चिंचवडेनगरचे सामाजिक कार्यकर्ते शेखरअण्णा चिंचवडे उपस्थित होते.























Join Our Whatsapp Group