पिंपरी (Pclive7.com):- कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लोकडाऊनच्या कालावधीत बंद करण्यात आलेले महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र टप्प्याटप्प्याने सुरु करण्यात येत आहेत. पिंपरी चिंचवड शहरातील ९६ पैकी ४६ केंद्र सुरू करण्यात आली आहेत.
कोरोना प्रतिबंधित क्षेत्र वगळता येत्या काही दिवसांत उर्वरित वीजबिल भरणा केंद्र सुरु करण्यात येणार आहेत. तसेच २३ मार्चपासून मीटर रिडींग व छपाई केलेल्या कागदी वीजबिलांचे वितरण देखील बंद करण्यात आले. त्यामुळे वीजग्राहकांना वीजवापराएवढे सरासरी बिल एसएमएसद्वारे तसेच ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात येत आहे. वीजग्राहकांना पाठविण्यात आलेले सरासरी वीजबिल भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वीजग्राहक व कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक व सार्वजनिक स्वरुपात आरोग्याची काळजी घेऊन वीजबिल भरणा केंद्र सुरु करण्याची परवानगी स्थानिक प्रशासनाकडून महावितरणला देण्यात आली आहे. ही काळजी घेऊन महावितरणने ही केंद्र सुरू करण्यात आली आहेत.
यामध्ये महावितरण, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक तसेच इतर सहकारी बँका व पतसंस्थांकडून चालविण्यात येणाऱ्या अधिकृत वीजबिल भरणा केंद्राचा समावेश आहे. शहरातील पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखांमध्ये वीजबिल भरणा करण्याची सोय उपलब्ध आहे.























Join Our Whatsapp Group