पिंपरी (Pclive7.com):- पोलीस फ्रेन्ड्स वेलफेअर असोसिएशनचे संस्थापक गजानन चिंचवडे यांच्या वाढदिवसानिमित्त संत तुकारामनगर पोलीस चौकीतील पोलीस कर्मचाऱ्यांना फेस शिल्ड मास्क व ‘कोविड योद्धा’ सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले.
कोरोनासारख्या महामारीच्या परिस्थितीत पोलिसांनी या आजाराचा संसर्ग वाढू नये तसेच शासनाने घालून दिलेल्या निर्बंधांचे नागरिकांनी काटेकोरपणे पालन करावे म्हणून जीव धोक्यात घालून काम केले. या त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून संत तुकारामनगर पोलीस चौकीतील पोलीस कर्मचाऱ्यांना फेस शिल्ड मास्क व ‘कोविड योद्धा’ सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले.
यावेळी पोलीस फ्रेन्ड्स वेलफेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्याचे संस्थापक, प्रदेशाध्यक्ष गजानन चिंचवडे, युवक अध्यक्ष शुभम चिंचवडे, पुणे जिल्हा उपाध्यक्ष सचिन लाड, संत तुकारामनगर शाखा अध्यक्ष केशव त्रिभुवन, उपाध्यक्ष दीपक साबळे, कार्याध्यक्ष पांडुरंग गंगणे, पिंपरी सदस्य रवी मांडवे, प्रगत भारतचे संपादक दत्ता कांबळे, संत तुकारामनगर पोलीस चौकीचे सहायक पोलीस निरीक्षक चव्हाण आणि इतर कर्मचारी उपस्थित होते.























Join Our Whatsapp Group